Saptashrungi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडाचा चेहरामोहरा बदलणार! ही विकासकामे होणार

Saptashrungi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडाचा चेहरामोहरा बदलणार! ही विकासकामे होणार

Saptashrungi Gad : सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून चार हजार ५६९ फूट उंचीवर असलेल्या, निसर्गसौंदर्याबरोबरच भक्तिमय वातावरणाने भारावलेल्या व आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडाच्या विकासासाठी सुमारे ८१ कोटी ८६ लाखांचा आराखडा राज्य शासनाने मंजूर केल्याने होणाऱ्या विकासकामांनंतर सप्तशृंगगडाचा लवकरच चेहरामोहरा बदललेला भाविकांना पाहावयास मिळेल.

देशातील १०८ शक्तिपीठांपैकी एकमेव स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगड या तीर्थक्षेत्रास सन २००१ पासून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा होता. गडावर वर्षभर भाविकांसह पर्यटक लाखोंच्या संख्येने येत असतात. विशेषत: चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागरी पौर्णिमा या प्रमुख उत्सवांत भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती असते. (development works will done on Saptshringigarh nashik news)

येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत उपलब्ध मूलभूत सुविधांची कमतरता असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. मंदिर परिसरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अतिशय अल्प निधी मिळत होता. त्यामुळे गडावर विकासकामे करण्यास प्रशासन व ग्रामपंचायतीस मर्यादा येत होती.

तत्कालीन युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले दादा भुसे यांच्याकडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तीर्थक्षेत्रास ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यावर सन २०१७ मध्ये सप्तशृंगगडास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला होता.

मात्र, तद्पासून तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत विविध विकासकामांचा प्रस्ताव सप्तशृंगगड ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. यात वेळोवेळी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व विद्यमान पालकमंत्री दादा भुसे, आमदार नितीन पवार, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

Saptashrungi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडाचा चेहरामोहरा बदलणार! ही विकासकामे होणार
Navratri Festival : नवरात्र अन कावडयात्रेत सप्तशृंगी गडावर खाजगी वाहनांना प्रवेशबंदी

विविध विकासकामांचा आराखडा बनविण्यात येऊन मंत्रालयात पाठविण्यात आला होता. त्यास आजी- माजी पालकमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सप्तशृंगगडावर आदिमायेचरणी शनिवारी (ता. ७) लीन झाल्यावर आमदार नितीन पवार यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात आराखड्यास मंजुरी देत असल्याचे जाहीर केले.

सोमवारी (ता. ९) मुख्यमंत्र्यांनी आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन ८१ कोटी ८६ लाखांचा आराखडा मंजूर केल्याने आराखडा मंजुरीच्या जवळपास पाच वर्षांच्या प्रतीक्षेला विराम मिळाला. या कामांमुळे सप्तशृंगगडाचा चेहरामोहरा बदलून भाविक- पर्यटकांना चांगल्या प्रकारच्या सुख-सुविधा उपलब्ध होतील. गडावरील रोजगारासह अर्थकारणालाही बळकटी प्राप्त होऊन सप्तशृंगगडास नववैभव प्राप्त होणार आहे.

सप्तशृंगगडावर होणारी विकासकामे

सर्व सुविधांयुक्त भक्त निवास, अद्ययावत बसस्थानक, अद्ययावत सुलभ शौचालय, गावांतर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मुख्य रस्त्यावर डोम (निवारा शेड), सुसज्ज रुग्णालय, गडावरील पुरातन १०८ कुंडे पुनर्जीवित करणे, नवीन बंधारा, सांडपाणी प्रकल्प, पाइपलाईन, नक्षत्र बगीचा, ११ केव्हीए एलटी वाहिनी भूमिगत करणे, नांदुरी ते सप्तशृंगगडापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप, दरड कोसळण्यापासून संरक्षणात्मक जाळी बसविणे आदी.

Saptashrungi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडाचा चेहरामोहरा बदलणार! ही विकासकामे होणार
Saptashrungi Gad News : सप्तशृंगगडाच्या विकासाचा 81 कोटींचा आराखडा मंजूर; आमदार पवार यांच्या मागणीला यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com