esakal | देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar nashik 123.jpg

-देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये. उद्धव ठाकरे यांची नाशिकला भेट देण्याची इच्छा आहे ते येतील. पण आम्ही आमचे निरीक्षण घेत आहोत. ते धोरणात्मक निर्णय घेतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले

देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये - शरद पवार

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : खासगी हॉस्पिटल जास्त बिल घेतात त्यांचे ऑडिट होत असून यापुढे याची तपासणी कडक केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याची वेळ डॉक्टरांनी आणू नये असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये दिला. राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता.२४) घेतला. त्याअंतर्गत शुक्रवारी त्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्ह्याचा आढावा बैठक पार पडली. त्यांच्यासमवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे देखील उपस्थित होते. 

पत्रकार परिषदेत शरद पवार आणखी काय म्हणाले
-देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये-उद्धव ठाकरे यांची नाशिक ला भेट देण्याची इच्छा आहे ते येतील. पण आम्ही आमचे निरीक्षण घेत आहोत. ते धोरणात्मक निर्णय घेतील

-लॉकडाऊन संदर्भात बोलताना आर्थिक संकट मोठं आहे, लॉक डाऊनचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा. तसेच तिथल्या हेल्थ सुविधा कशा आहेत त्यावर लॉकडाऊन अवलंबून आहे, असे पवार म्हणाले. आज नाशिक मध्ये 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान जी रुग्ण संख्या वाढणार त्या तुलनेत मूलभूत सुविधा आहेत. असेही म्हणाले

-अनेक तज्ञांनी सांगितले कोरोनाला घेऊन जगावे लागेल, म्हणून जिथे रुग्ण जास्त आहे तिथे आढावा घेत आहोत.

-धारावी प्रमाणे मालेगावला प्लझ्मा थेरपी सेंटर सुरू करणार

-मुस्लिम समाज रमजान ईद प्रमाणे सामंजस्य दाखवेल अशी अपेक्षा आहे. 
मी यात फार काही बोलणार नाही

सात हजारांहून अधिक रुग्ण अन्‌ एक हजार मृत्यू 
नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या २५ हजारांच्या पुढे पोचली आहे. त्यातील एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत सात हजार १०० हून अधिक रुग्ण उपचार घेताहेत. जिल्हानिहाय बाधित रुग्णांची, सद्यःस्थितीत दाखल रुग्णांची, कोरोनामुक्त झालेल्यांची आणि मृत्यूंची संख्या अनुक्रमे अशी ः नाशिक ः १० हजार ९६९-२ हजार ७३८-७ हजार ७९८-४३२. नगर ः २ हजार ४०३-९७३-१ हजार ३८४-४६. धुळे ः २ हजार २३०-५८७-१ हजार ५५३-९०. जळगाव ः ८ हजार ६०७-२ हजार ७१०-५ हजार ४७०-४२७. नंदुरबार ः ४१६-१४४-

संपादन - ज्योती देवरे