Devendra Fadnavis
sakal
नाशिक: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १० नोव्हेंबरच्या आसपास घोषित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याआधीच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा प्रारंभ करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ७ नोव्हेंबरला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती मिळते.