Devendra Fadnavis : पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी वळविणार; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी डॉ. भारती पवार यांना विजयी करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत केले.
Manmad Deputy Chief Minister Devendra Fadnavis speaking at Dr. Bharti Pawar's campaign rally.
Manmad Deputy Chief Minister Devendra Fadnavis speaking at Dr. Bharti Pawar's campaign rally.esakal

मनमाड : ही गल्लीची निवडणूक नाही तर देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. जगभरात ज्यांच्या नेतृत्वाचा गौरव होत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी डॉ. भारती पवार यांना विजयी करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत केले. (Devendra Fadnavis)

नाशिक, नगर, मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला वळविण्यात येईल. मनमाडसाठीचा बायपासचा प्रश्न तातडीने सोडवण्यात येईल. आमदार सुहास खांदे यांनी आज केलेल्या मागण्या निवडणूक संपताच तातडीने मार्गी लावण्यात येतील असे ठोस आश्वासन देखील फडणवीस यांनी दिले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे या सभेस उपस्थित होत्या. येथील महर्षी भगवान वाल्मीकी क्रीडा संकुलात ही सभा झाली. उमेदवार डॉ. भारती पवार, आमदार सुहास कांदे, सौ. अंजुम कांदे, विकास महात्मे, प्रताप दिघावकर, विजय चौधरी, विजया रहाटकर उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांनी मुस्लिम समाजाबद्दल विरोधकांकडून होत असलेल्या प्रचाराबाबत सांगताना मोदी सरकारच्या काळात सर्व शासकीय योजनांचा लाभ मुस्लिम समाजाला देखील मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे सांगत बहुमत मिळाल्यास भाजप घटना बदलेल या अपप्रचाराला मतदारांनी बळी पडू नये असे आवाहन केले. (latest marathi news)

Manmad Deputy Chief Minister Devendra Fadnavis speaking at Dr. Bharti Pawar's campaign rally.
Nashik Lok Sabha Constituency : प्रभावी प्रचारापेक्षा लढाऊ खासदार हवा; अंतिम टप्यातील प्रचारावर नवमतदारांचा कौल

डॉ. पवार यांनी पाच वर्षातील विकास कामांचा लेखाजोखा सादर करताना विविध योजना यांची अंमलबजावणी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात केल्याचे सांगितले. कांदा व शेती पिकांसाठी हमी भाव मिळावा यासाठी नक्कीच उपाययोजना करण्यात येतील असे सांगून कांदा उत्पादकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

आमदार कांदे यांनी गेल्या पाच वर्षांतील विकास कामांचा आढावा मांडला. मनमाड शहरासाठी बायपास करून द्यावा, एमआयडीसीमध्ये उद्योग यावेत, डाव्या कालव्याचे तिसऱ्या पाण्याचे शेवटचे आवर्तन आरक्षित करण्यात यावे, झाडी कालव्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण करावे, गिरणा उजव्या कालव्यातून टाकळी आणि मांजरासाठी पाणी मिळावे या मागण्याही त्यांनी केल्या. महायुतीतील पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Manmad Deputy Chief Minister Devendra Fadnavis speaking at Dr. Bharti Pawar's campaign rally.
Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजे यांचे ‘कुटुंब उतरलंय प्रचारात’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com