पंचवटी- नाशिक बाजार समितीचा सभापती म्हणून सुमारे ३० वर्षे प्रामाणिकपणे कार्य केले आहे. त्या वेळी समितीचे वार्षिक उत्पन्न १५ लाखांहून आज २५ कोटी २५ लाख रुपयांपर्यंत नेले. प्रामाणिक कार्य केल्यानेच हे शक्य झाले असून, बाजार समिती सभापती व संचालकांनी केलेल्या आरोपांपैकी एक जरी सिद्ध झाला तरी राजकीय संन्यास घेईल, असे माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितले.