Sharad Pawar
sakal
देवळा: देवळ्यासारख्या ग्रामीण भागात अनाथांना आधार देण्याचे, त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट व यशवंत गोसावी करीत आहेत. मानव व माणुसकीची सेवा करणे ही अत्यंत जमेची बाजू आहे. हे काम अविरतपणे पुढे चालत राहण्यासाठी समर्थ साथ दिली जाईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.