देवळाली कॅम्प- ‘स्वच्छ देवळाली, सुंदर देवळाली, हरित देवळाली’ या घोषणेनुसार काम करत, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात दुसरे, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. गेल्या वर्षीही देवळालीने राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता.