चणकापूर उजवा वाढीव कालव्यातून पाणी मिळत नसल्याने देवळा तालुका पूर्व भाग आक्रमक....असंतोष उफाळण्याचे संकेत

चणकापूर उजवा वाढीव कालव्यातून पाणी मिळत नसल्याने देवळा तालुका पूर्व भाग आक्रमक....असंतोष उफाळण्याचे संकेत
Published on: 
देवळ्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थ आक्रमक चणकापूरच्या उजव्या कालव्यातील पाण्यासाठी उद्रेक सकाळ वृत्तसेवा देवळा, ता.२२ : जेव्हा पावसाचे पूरपाणी गिरणा नदीतून वाहून जात होते त्यावेळी देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व नागरिक चणकापूर कालव्यातून पाणी मिळेल अशी वाट पाहत होते. मात्र पावसाळा संपला तरी पाणी न मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असून उद्या शुक्रवार (ता.२३) तालुक्याच्या पूर्व भागातील १८ गावातील शेतकरी ५० वर्षांपासून रखडलेला चणकापूर-झाडी कालवा प्रकल्प'' बाबतचे उत्तर व पुढील ठोस कार्यक्रमाला एकत्र जमणार आहे. यंदा दुष्काळामुळे देवळा तालुक्यातील पूर्व गावांमधील खरीप हंगाम वाया गेला आहे. कालव्याचे थोडेफार पाणी मिळाले असते तर काही पिके वाचली असती. पण चणकापूर वाढीव कालवा काही दिवसच चालल्याने आणि त्यातही पाण्याची पळवापळवी झाल्याने पूर्व भागातील जनता तहानलेलीच राहिली. पुढील काळात याबाबत ठोस उपाययोजना व्हावी यासाठी ''चलो देवळा'' चा नारा देत भूमिका ते व्यक्त करणार आहेत. ''चलो देवळा'' च्या या आंदोलनात त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यात रामेश्वर ते झाडी कालव्याचे रुंदीकरण करून वहनक्षमता वाढविण्यात यावी. चणकापूर झाडी कालव्याला रामेश्वर धरणातून बायपास करण्यात यावे. झाडीपर्यंत सर्व गावांसाठी शेती व पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात यावे, तालुक्याच्या पूर्व भागातील अठरा गावांमधील शेतकरी व नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. कोट "चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी मिळावे यासाठी देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता आस लावून बसलेली असताना वाढीव कालव्याचे पाणी मिळत नसल्यामुळे गेल्या महिन्यात आम्ही दहिवडकर ग्रामस्थांनी उपोषणही केले होते. किमान वाहून जाणारे पुरपाणी तरी पूर्ण क्षमतेने पूर्व भागातील जनतेला मिळावे." -संजय दहिवडकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com