वणी- आदिमायेच्या चैत्रोत्सवासाठी ठिकठिकाणच्या पालख्या, दिंड्यांबरोबरच भाविकांचे लहान-मोठे समूह गडावर आदिमायेचा जयघोष करीत व डीजेवरील देवीची गाणी लावून नाचतगात येऊ लागल्याने गड परिसर दणाणून गेला आहे. दरम्यान, तिसरी माळ व कामदा एकादशीची आदिमायेची पंचामृत महापूजा मंगळवारी (ता. ८) श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम यांनी परिवारासह केली. दरम्यान, विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून देवीच्या आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली.