खेडलेझुंगे- येथे हनुमान जन्मोत्सव भक्तिभावाने झाला. येथील पुरातन हनुमान मंदिरात पहाटे सहाला हनुमान जन्मोत्सव साजरा केला. मूर्तीची पूजा करत त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सर्वांनी पेढे व खिरापत वाटप केले. यानंतर ३६ नक्षत्र व १२ राशींचे वृक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या नक्षत्रवन येथे सर्व भाविक एकत्र आले. तेथे काशिनाथ महाराज यांच्या संकल्पनेतून साकारल्या १११ फूट उंच अभयवरद हनुमान मूर्तीसमोर हनुमान चालिसा पठण केले.