Shravan Maas: श्रावण मासानिमित्त भाविकांचा ओघ नाशिककडे! विविध मंदिरात भक्तांची मांदियाळी

Shravan Maas
Shravan Maasesakal

Shravan Maas : श्रावण मासानिमित्त एकीकडे रामतीर्थावर पवित्र स्नानासाठी झालेली भाविकांची अलोट गर्दी, दुसरीकडे कपालेश्वर मंदिरातून येणारा 'बम बम भोले’ चा गजर.

श्री काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्रांचा जयघोष... तपोवनातील संत जनार्दन स्वामी आश्रमातील अनुष्ठानार्थींचा ‘ओम जनार्दनाय नम:’चा मंत्रघोष...तिकडे त्र्यंबक नगरीत त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आणि कुशावर्तावर स्नानासाठी उडालेली देशभरातील भाविकांची झुंबड... आणि जिल्हाभरात विविध मंदिरांमध्ये सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम, अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने तिर्थक्षेत्र नाशिक नगरीची प्रसन्नता वाढवली आहे. (Devotees flock to Nashik on occasion of Shravan Maas crowd of devotees in various temples)

बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक असून, गोदावरीचा उगम होतो. शिवलिंगात ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही ईश्वर विराजमान आहेत. त्यामुळेच ज्योतिर्लिंगाची महिमा अपरंपार आणि त्याहून कितीतरी अधिक अद्भुत आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या त्र्यंबकेश्वर मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील मंदिर आहे. भाविक हे कुशावर्तावर स्नानासाठी एकच गर्दी करतात. तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी देशभरातील भाविक गर्दी करत असतात.

पंचवटी कपालेश्वर मंदिर जगातील नंदी नसलेले एकमेव मंदिर आहे. प्रत्येक सोमवारी, शनिवारी, प्रदोषाच्या दिवशी आणि पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.

महादेवांच्या कपालिक पिंडीच दर्शन घेतल्यास भाविकांची सर्वपातकांतून सुटका होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

काळाराम मंदिर अतिप्राचीन आहे. प्राचीन वास्तू कलेतून निर्मिती झाली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अनन्य साधारण असे महत्त्व आहे. रा तीर्थावर आलेला भाविक काळारामाचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही तसेच सीता गुंफा येथेही जात असतो.

मुंबई- आग्रा महामार्गावर मनकामेश्वर मंदिरात महादेवाचा एकमुखी व पंचमुखी मुखवटा आहे. मंदिरात नित्यपूजा, पाठ, दररोज रूद्र पाठ, व अभिषेक केला जातो आणि पंचमुखी मुखवटा सोमवार, शनिवार व प्रदोष दिनी पालखी निघते, व साडे आठ वाजता महाआरती होते.

श्रावण मास व्यतिरिक्त एक मुखी मुखवटा असलेल्या महादेवाची पालखी निघते. श्री शर्वायेश्वर महादेव मंदिरांची प्रतिष्ठापना ही राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांनी अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shravan Maas
Folk Artist: गायी चारत बासरीवादनातून संगीतसाधना! सनई-संबळला जिल्हाभरातून मोठी मागणी

या मंदिरात नित्य पूजा पाठ सुरू असतात. नांदूर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर, म्हसरुळ, मखमलाबाद, आडगाव, मानूर येथील शिवमंदिरात भाविकांची गर्दी असते. मंदिर परिसरात विक्रेत्यांनी बेलपत्र, बेलफळ, फुले आणि शिवमुठ मूग यांचे दुकाने थाटली आहे.

कैलासमठात नर्मदेश्वर रुद्राभिषेक

कैलास मठातील भक्तिधाम येथे श्री नर्मदेश्वर महादेव रुद्राभिषेक सुरू करण्यात आलेला आहे. कैलास मठाचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत सहस्त्र दीपोत्सव व महाआरती अनुष्ठान सायंकाळी सहा वाजता घेण्यात येत आहे.

हा सोहळा (ता. ९) सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. गोदातीरालगत सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरात विविध कार्यक्रम घेतले जातात. भक्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

येथेही भाविक नतमस्तक

गोदापात्रातील सिद्धपाताळेश्वर, नीलकंठेश्वर, कर्पुरेश्वर, त्यागेश्वर, टाळकुटेश्वर मंदिरात भाविक पर्यटक दर्शन घेतात. तपोवनातील महामृत्युंजय महादेव मंदिर, सीता गुंफा येथील मंदिरातदेखील भाविक दर्शनाचा लाभ घेत आहे.

Shravan Maas
Ganeshotsav 2023: ‘व्हाईस’चे काम मिळाले पण दाम मिळेना! कलाकारांची स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com