विकास गिते : सिन्नर- नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आसिमा मित्तल यांचा नियोजित दौरा सिन्नर तालुक्यातील वडांगळी व देवपूर येथे संपन्न झाला. देवपूर येथे येताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुखदेव राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आसिमा मित्तल यांना पारंपारीक वेशभूषेमध्ये लेझीमच्या तालावर अभिवादन व स्वागत केले. छत्रपती शिवरायांच्या काळातील युद्ध कला त्याचबरोबर काठीवरच्या कसरती यांचे अनोखे दर्शन घडवले.