हुंडीवाला लेन देववाडा घरपोडीत पावणे आठ लाखांचे दागिने लंपास

हुंडीवाला लेन देववाडा घरपोडीत पावणे आठ लाखांचे दागिने लंपास
Published on: 
हुंडीवाला लेन भागातील देववाड्यात घरफोडी; दागिने लंपास जुने नाशिक, ता.१३ : दहीपूल परिसरातील हुंडीवाला लेन येथील देववाड्यात बंद घराचा मागील लाकडी दरवाजा तोडून चोरट्य़ांनी सुमारे ७ लाख ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी (ता. १२) दुपारी ही घटना घडली. मंदार देव यांच्या तक्रारीवरून तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांचे काका बाळकृष्ण देव हे मखमलाबाद येथील एका क्रेंदात उपचार घेत असल्याने त्यांचे घर बंद होते. सोमवारी (ता.१२) दुपारी घरातील भाडेकरू नरेश शहा यांना घराच्या परिसरात संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्यांनी मागील बाजूस जाऊन पाहिले असता एक अनोळखी व्यक्ती उभी असल्याचे दिसले. तसेच घराच्या पहिल्या मजल्यावरही काही जण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आवाज दिल्यानंतर दोन तरुणांनी पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारून पळ काढला. शहा यांनी मंदार देव यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. आतून कडी लावलेली असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी मागील बाजूने घराची पाहणी केली असता मागील लाकडी दरवाजा तोडलेला, घरातील सामान अस्ताव्यस्त आणि लोखंडी कपाट फोडलेले आढळले. या वेळी चोरट्य़ांनी सोन्या चांदीची दागिने, तांबे-पितळेची जुनी भांडी, असा सुमारे ७ लाख ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला. .......... संशयित सीसीटीव्हीत कैद देववाडा परिसरातील कटलरी दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. संशयित त्यात कैद झाले आहे. दुपारी पावणेदोनला दोन संशयित घराच्या पुढील बाजूने उडी मारून पळून जाताना त्यात दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com