Dhakambe Robbery Case : ग्रामीण पोलिस दरोडेखोरांच्या मागावर गुजरात, मध्यप्रदेशात!

Maharashtra Police
Maharashtra Police esakal

नाशिक : ढकांबे (ता. दिंडोरी) शिवारातील दुमजली बंगल्यावर सशस्त्र दरोड्याच्या घटनेला चार दिवसांचा कालावधी उलटूनही ग्रामीण पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागू शकलेले नाहीत. मात्र, काही सुगाव्याच्या आधारे स्थानिक गुन्हेशाखा व दिंडोरी पोलिसांची पथके गुजरात व मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. शनिवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास या सशस्त्र दरोड्यात चोरट्यांनी सुमारे २८ तोळे सोने व रोकड असा १७ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. (Dhakambe Robbery Case Rural police on trail of robbers in Gujarat Madhya Pradesh Nashik News)

ढकांबे शिवारातील रतन शिवाजी बोडके यांच्या शिवकमल या दुमजली बंगल्यावर गेल्या शनिवारी (ता. १२) पहाटे दोनच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. दरोडेखोरांकडे पिस्तूल, धारदार हत्यारे, गज असे साहित्य असल्याने बोडके कुटुंबीयांना दरोडेखोरांना विरोध केला नाही.

दरोडेखोरांनी बोडके कुटुंबीयांना वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये बंद करून घरातील २८ तोळे सोने, साडेआठ लाखांची रोकड असा १७ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच, प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिस पथके रवानाही करण्यात आली होती.

Maharashtra Police
Nashik Crime News : मालेगावी अल्पवयीन मुलीचे अपहरण, सुटका अन्‌ संशयिताला अटक

मात्र, सदरील दरोड्याच्या घटनेला चार दिवस उलटूनही ग्रामीण पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत ठोस अशी माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा व दिंडोरी पोलिसांची पथके जिल्ह्याच्या सीमावर्ती असलेल्या गुजरात, तसेच मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात रवाना करण्यात आलेली आहेत. याशिवाय काही पथकेही दरोडेखोरांच्या वर्णनांनुसार काही गावांमध्ये तळ ठोकून तपास करीत आहेत.

‘भटू’चा घेताय शोध

ढकांबे दरोडाप्रकरणामध्ये ‘भटू’ नावाच्या संशयिताचे नाव समोर आले आहे. त्यानुसार, पोलिस भटू नाव असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती राज्यभरातून संकलित केली जात आहे. या नावाच्या गुन्हेगारांच्या माहितीनुसार पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Police
Nashik Crime News : देवगाव येथे अवैद्य धंद्यांचा कळस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com