
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह अन्य विविध आरोपांमुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचेकडे असलेले खाते आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे. या राजकीय वादळानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात 10 दिवसांचा आश्रय घेतला.