पान एक (सोने, चांदी चित्र घेणे)
------------------
सुवर्णपेठेत सोने खरेदीला झळाळी
धनत्रयोदशीला सोळा कोटींची उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.७ : सोने चांदीचा दर घसरल्याने आणि सणामुळे येथील सुवर्णबाजारात ग्राहकांची सोन्याची दागिने, चांदीच्या वस्तू घेण्यासाठी गर्दी होत आहे. धनत्रयोदशीला सुवर्णबाजारात सुमारे सोळा ते सतरा कोटींची उलाढाल झाली. सप्टेंबर २०२६ चे भाव पाहता आताच्या भावात सोन्यात ८ तर चांदीत ४३ हजारांची घट झाली आहे. यामुळेच बाजारपेठेत सध्या गर्दी होत असल्याचे चित्र आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी व्यवसायाला आलेली झळाळी रविवारी (ता.८) लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही कायम राहील असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांना आहे.
धनत्रयोदशीला गतवर्षी सोन्याचा भाव १ लाख २८ हजार ५०० प्रतिदहा ग्रम होता. यंदा तो १ लाख ४६ हजार ८७८ होता. यात १८ हजारांचा फरक आहे. म्हणजे गतवर्षी पेक्षा १८ हजार ३७८ रुपयांनी सोने यंदा महाग आहे. तीच स्थिती चांदीची आहे. गतवर्षी चांदी १ लाख ७० हजार रुपये प्रती किलो होती. यंदा २ लाख ९२ हजार ६१० आहे. यात २२ हजार ६१० फरक आहे. तेवढी चांदी यंदा महाग आहे. मात्र दोन महिन्यापूर्वी सप्टेंबरला १ लाख ५० हजारांवर असलेले सोने आज १ लाख ४२ हजारांवर (७ हजार ५०० ने कमी आहे). तर चांदीचा भाव २ लाख ३१ हजार होता. तो आज १ लाख ८८ हजार (४३ हजारांनी कमी) आहे. यामुळे गुंतवणूकदारांची सोने, चांदी खरेदीसाठी गर्दी केली आहे.
-------------
सोने खरेदीची ही आहेत कारणे
दर कमी असल्याने कमी भावात खरेदी
लग्नासाठी तसेच गुंतवणुक
आर्थिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित पर्याय
सोन्याचे भाव पुन्हा वाढतील, अशी आशा
केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी
डॉलर कमकुवत होणे, व्याजदर कमी होण्याची अपेक्षा
यामुळे सोन्यातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळू शकते.
बँक ठेवींपेक्षा सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा अशी धारणा