दोंडाईचा. येथे आरक्षण बाबतीत धनगर समाजाची बैठक

दोंडाईचा.  येथे  आरक्षण बाबतीत  धनगर समाजाची बैठक
Published on: 
DO126B04354 दोंडाईचा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करताना दीपक बोराडे. -------- धनगर आरक्षणासाठी उद्या धुळ्यात महामोर्चा दीपक बोराडे : ‘गट-तट विसरून समाजाच्या भल्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा दोंडाईचा, ता. १३ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळवून देण्यासाठी गट-तट विसरून समाजाच्या भल्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. ही आरक्षणाची शेवटची लढाई समजून एकजुटीने लढा दिल्यास वर्षभरात आरक्षण मिळविल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवायचा आहे. मुला-बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी १५ ऑक्टोबरला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या धनगर समाजाच्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक बोराडे यांनी केले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी १५ ऑक्टोबरला धुळे येथे होणाऱ्या महामोर्चाच्या प्रचारासाठी दोंडाईचा येथील धनगर समाज मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली. या वेळी बोराडे यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी दीपक बोराडे संपूर्ण धुळे जिल्ह्यात जनजागृती करत असून, त्याचाच एक भाग म्हणून दोंडाईचा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सपीठावर विजय तमनर, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सरग, धनगर समाजाचे अध्यक्ष सुनील धनगर, भाजपचे शहर उपाध्यक्ष मनोज धनगर, नगरसेवक भैय्या धनगर, माजी नगरसेवक भूपेंद्र बाविस्कर, वाल्मिक अडगाळे, सुभाष ठाकरे आणि सोमनाथ बोरसे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com