धनत्रयोदशीच्या सुवर्णमुहूर्तावर जगदंबेची विशेष महापूजा ब्राह्मण समाजाची परंपरा अखंडित; सुख, समृद्धी आणि शांततेसाठी भगवतीचरणी प्रार्थना

धनत्रयोदशीच्या सुवर्णमुहूर्तावर जगदंबेची विशेष महापूजा ब्राह्मण समाजाची परंपरा अखंडित; सुख, समृद्धी आणि शांततेसाठी भगवतीचरणी प्रार्थना
Published on: 
पान- २ मेन 13453 वणी ः धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवारी श्री जगदंबा मातेची सपत्नीक महापूजा आरती करताना किरण पाठक व ब्राह्मण महिला मंडळ. जगदंबेच्या चरणी सुख आणि शांततेसाठी प्रार्थना वणी ः धनत्रयोदशीनिमित्त विशेष महापूजा; अनेक वर्षांपासूनची परंपरा सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ६ : धनत्रयोदशीनिमित्त येथील ग्रामदैवत आणि सप्तशृंगी देवीची ज्येष्ठ भगिनी मानल्या जाणाऱ्या जागृत जगदंबा देवी मंदिरात ब्राह्मण समाजातर्फे विशेष महापूजा करण्यात आली. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात जपण्यात आली. ......... धनत्रयोदशीनिमित्त जगदंबा देवीची विशेष पूजा-अर्चा करून समाजातर्फे भगवतीला साकडे घालण्यात आले. मानवी जीवन सुखमय, शांतिमय आणि निरामय राहावे, प्रत्येकाच्या जीवनात धन-धान्य, ऐश्वर्य, समाधान आणि शांती नांदावी, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. समाजातील धार्मिक परंपरा आणि संस्कारांची पुढील पिढ्यांनाही ओळख व्हावी तसेच ही परंपरा अखंडित सुरू राहावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महापूजेचे पौरोहित्य जगदंबा देवी मंदिराचे प्रमुख पुजारी सुधीर दवणे यांनी केले. ३८ वर्षांपासून ते जगदंबा देवीची सेवा करीत असून, धार्मिक विधी आणि पूजाअर्चेची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा-अर्चा आणि श्रीसूक्त पठण करण्यात आले. श्रीसूक्तम पठणासह पार पडलेल्या विशेष पूजाविधीत सुचित्रा पाठक आणि मितलता पाठक यांच्या हस्ते पूजाविधा झाला. या सोहळ्यात ब्राह्मण समाजातील महिला व पुरुष सहभागी झाले होते. जगदंबा देवीच्या चरणी नतमस्तक होत सर्वांनी मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. सुरेश माळेकर, प्रकाश माळेकर, वासुदेव जोशी, किशोर धर्माधिकारी, किरण पाठक, राहुल माळेकर यांच्यासह सुनंदा दवणे, सुवर्णा दवणे, ऊर्मिला दवणे, स्मिता माळेकर, मंगल माळेकर, ज्योती माळेकर, भाग्यश्री माळेकर, सुचित्रा पाठक, स्वाती पाठक, राधिका धर्माधिकारी, राधिका कुलकर्णी, मंजू जोशी, कविता देशपांडे, रूपाली कुलकर्णी, पद्मा देशपांडे, सरिता देशपांडे आदी उपस्थित होते. ........... चौकट परंपरेतून धार्मिक संस्कारांचे जतन धनत्रयोदशीला विशेष महापूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येकाच्या घरात सुख-समृद्धी नांदावी आणि समाजाचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना जगदंबा देवीच्या चरणी करण्यात आल्याचे पुजारी वासुदेव जोशी व सुधीर दवणे यांनी सांगितले. .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.