धर्म ध्वज ग्राम परिक्रमा

धर्म ध्वज ग्राम परिक्रमा
Published on: 
दहा चित्ररथांच्या भोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त संदीप कर्णिक : धर्म ध्वज ग्राम परिक्रमा नियोजन बैठकीत माहिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, २१ : शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता, बाहेरून येणाऱ्या भाविकांची, तसेच परिक्रमेत सामील होणाऱ्या नागरिकांची अचूक आकडेवारी मिळाल्यानंतर सूक्ष्म नियोजन करता येईल जेणेकरून चेंगराचेंगरी सारख्या टाळता येतील. त्याचबरोबर धर्म ध्वज ग्राम परिक्रमेवेळी निघणाऱ्या दहाही चित्ररथांभोवती कडेकोट बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पवित्र पर्वानिमित्ताने भव्य ‘धर्म ध्वज ग्राम परिक्रमा’ कार्यक्रम (ता.३०) ऑक्टोबरला नियोजित असून त्याची नियोजन बैठक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली शंकराचार्य संकुलाच्या नानासाहेब ढोबळे सभागृहात बुधवारी पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सुरवातीला प्रतीक शुक्ल यांनी कार्यक्रमाची रूपरेषा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना सांगितली. याप्रसंगी सतीश शुक्ल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुहास वैद्य यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या सिंहस्थ समितीतर्फे ३० ते १ नोव्हेंबर दरम्यान रामतीर्थ, पंचवटी येथे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम होणार असल्याने शुक्रवारी (ता.३०) दुपारी दोनला मोदी मैदान येथून भव्य ग्राम परिक्रमा काढण्यात येणार आहे. त्याचा समारोप रामतीर्थावर होणार आहे. या परिक्रमासंदर्भात अद्यापपर्यंत नियोजन सुरू असून यामध्ये अधिकाधिक भाविकांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चौकट परिक्रमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यानुसार भाविकांना कोणत्या कामात आवड आहे त्यानुसार कामाची निवड करता येईल. परिक्रमेच्या दिवशी दुपारी एकला तिन्ही आखाड्यांचे प्रमुख, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, पालकमंत्री, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त यांच्यासह संत महंताचे स्वागत कार्यक्रम होईल. त्यानंतर ठीक दाेनला दहा चित्ररथ, शोभायात्रा, ढोलताशा पथके, शंखदनाद, स्वागत यात्रा, रथयात्रेत शहरातील विविध धार्मिक संस्थांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी साडेसहाला रामतीर्थावर पोहचल्यानंतर ध्वजारोहणापूर्वीची संध्या आरती होऊन शोभायात्रेचे विसर्जन होईल, अशी माहिती सतीश शुक्ल यांनी दिली. फोटो : H33233

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com