सीमावर्ती आदिवासी भागात धवलक्रांती !

रोज अडीच हजार लिटर संकलन; वार्षिक व्यवसाय अडीच कोटींचा
सीमावर्ती आदिवासी भागात धवलक्रांती !

सुरगाणा (जि. नाशिक) : गुजरातच्या सीमावर्ती आदिवासी भागातील गोंदुणे (ता. सुरगाणा) येथील महिलांनी धवलक्रांती केली आहे. दररोज अडीच हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. दरमहा दहा रुपये बचतीतून सुरु झालेला दूध व्यवसाय आता वर्षाला दोन कोटी ५२ लाख रुपयांपर्यंत पोचला आहे. सुरगाणा तालुक्याच्या उत्तरेस गोंदुणे हे गाव आहे. सव्वीस वर्षांपूर्वी जिवली सादुराम भोये या भगिनीने तेरा महिलांना एकत्र करत दरमहा दहा रुपयांची बचत सुरु केली. महालक्ष्मी बचत गटाची स्थापना केली. महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाने उंबरठाणच्या पंजाब नॅशनल बँकेतर्फे अडीच लाखांचे कर्ज बचतगटाला मिळवून दिले.

त्यातून तेरा दुधाळ म्हशी खरेदी करण्यात आल्या. या सर्व महिला या निरक्षर आहेत. त्यांनी मनोहर भोये या दहावी शिकलेल्या तरुणाला सचिवपदी नियुक्त केले. तो सर्व आर्थिक व्यवहार पाहतो.डेअरमध्ये संकलित होणारे दूध डांग जिल्ह्यातील वघई येथील शीत केंद्रात पाठवले जाते. तेथे प्रक्रिया करून आलीपूर (जि. वलसाड, गुजरात) येथे पाठवण्यात येते.

दुधाने साधलेली प्रगती

  • सीमावर्ती भागातील सात गावांमधील स्थलांतर शून्यावर पोचले

  • रोजगारामुळे आदिवासी कुटुंबांना शैक्षणिक प्रगती साधता आली. शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली असून विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढली

  • राहणीमान सुधारले, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

  • प्रौढ साक्षरता वर्गात रात्री धडे गिरवून सदस्या सही करायला शिकल्या

आम्ही अनेक वर्षांपासून बचतगट चालवत आहोत. पंचायत समितीस्तरावरुन आम्हाला सहकार्य मिळत नाही. आम्हाला महाराष्ट्र सरकारने डेअरीसाठी अनुदान व सवलती दिल्यास हा व्यवसाय आम्हाला जोमाने सुरू करता येईल.

- जिवली भोये, अध्यक्ष, बिरसा मुंडा दूध डेअरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com