राष्ट्रीय एकता शिबिरात धीरज खंडारेची तीन पदकांची कमाई

राष्ट्रीय एकता शिबिरात धीरज खंडारेची तीन पदकांची कमाई
Published on: 
फोटो : NSK26H33851 नंदुरबार : धीरज खंडारे याचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी व मान्यवर. ------------- राष्ट्रीय एकता शिबिरात तीन पदकांची कमाई धीरज खंडारे याची उत्कृष्ट कामगिरी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २९ : येथील जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककातील स्वयंसेवक धीरज खंडारे याने हरियाणा येथे आयोजित राष्ट्रीय एकता शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करून तीन पदके मिळवून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला. भट्टू मंडी, फतेहाबाद येथे आयोजित या शिबिरात दहा राज्यांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित उपक्रमांनी हे शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात धीरजने कला- गुणांचे प्रभावी सादरीकरण करून समूह नृत्यात रजतपदक, वैयक्तिक कविता सादरीकरणात कांस्यपदक आणि वैयक्तिक गायनात कांस्यपदक पटकावले. या यशाबद्दल प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते धीरजचा सत्कार केला. प्राचार्य डॉ. रघुवंशी म्हणाले, धीरजने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले यश कनिष्ठ महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असून, त्याच्या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल. या वेळी उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, उपप्राचार्य प्रा. डी. ए. पाटील, प्रा. अंकुश रघुवंशी आदी उपस्थित होते. डॉ. मनोज शेवाळे यांचे धीरजला मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com