Latest Marathi News | धुळ्याचे अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव नाशिकचे शहर पोलिस उपायुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Bacchav & sharmila Valavalkar

Nashik : धुळ्याचे अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव नाशिकचे शहर पोलिस उपायुक्त

नाशिक : राज्यात १०४ अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. शर्मिला घार्गे तथा शर्मिष्ठा वालावलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारतील. महाडचे उपविभागीय अधिकारी नीलेश तांबे यांची मालेगावला अपर अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

मालेगावमधील अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, फोर्स वनचे किरणकुमार चव्हाण, धुळ्याचे अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव हे नाशिक शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून दाखल होतील. पिंपरी चिंचवडमधील पोलिस उपायुक्त इप्पर मंचक ज्ञानोबा हे पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) म्हणून पदभार स्वीकारतील. (Dhule Additional Superintendent Prashant Bachhav appointed Nashik City Deputy Commissioner of Police Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik News : जेलरोड येथे भंगार दुकानाला आग

नाशिक विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, शहर पोलिस दलातील उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात यांचा समावेश आहे. राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत होत्या. त्यातील १०४ जणांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी (ता. ७) निघाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूरला पोलिस अधीक्षक लोहमार्ग बदली झाली आहे. पोलिस उपायुक्त (परिमंडळ एक) अमोल तांबे यांची पुण्याला पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, तर विजय खरात (परिमंडळ दोन) यांची मुंबईला सहाय्यक पोलिस महानिरीक्षक, दक्षता पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात बदली झाली आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या नाशिकमधील उपायुक्त शर्मिला घार्गे तथा शर्मिष्ठा वालावलकर यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परीक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर श्रीमती गीता श्यामराव चव्हाण (उपायुक्त, बंदरे परिमंडळ) या सूत्रे स्वीकारतील.

हेही वाचा: Water Connection Inspection Campaign : शहरात अनधिकृत नळजोडणी तपासणी मोहीम