लाखांचा ऐवज लांबवला

लाखांचा ऐवज लांबवला
Published on: 
धुळे : टुडे पान १ साठी..सेकंड मेन -- फोटो क्रमांक : 33512 धुळे : देवपूर परिसरातील घरफोडीच्या घटनास्थळी घरातील कपाटावरील ठसे घेताना तज्ज्ञ. -- तीस ग्रॅम सोन्यासह लाखांचा ऐवज लांबवला -- देवपूरच्या आनंद नगरात घरफोडी; सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : शहरातील देवपूर परिसरातील आनंद नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याची घटना रविवारी (ता. २५) पहाटे उघडकीस आली. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवपूरमधील प्लॉट क्रमांक १५३, आनंद नगर, भोई सोसायटी येथे सुनील हिंमत भंडारी (वय ४२) हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात एका वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्यामुळे सुनील भंडारी कुटुंबियांसह चाळीसगाव येथे गेले होते. घराला कुलूप लावून संपूर्ण कुटुंब बाहेरगावी असल्याची संधी साधत चोरट्यांनी रविवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाची कडी व कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून आतील ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुमारे ३० ते ४० ग्रॅम वजनाचा ऐवज लांबविल्याचे सांगण्यात आले. यात सहा ग्रॅमची सोनसाखळी, सात ग्रॅमचे कानातले, पाच ग्रॅमचे काप आणि पाच ग्रॅमच्या मंगळसूत्राचा समावेश आहे. याशिवाय आठ ते दहा ग्रॅमचे चांदीचे कॉईन, प्रत्येकी अर्धा किलो वजनाच्या दोन चांदीच्या वाट्या, दहा चांदीचे ग्लास, तसेच चांदीचे गजानन, कामधेनू गाय आणि चांदीचे मासे चोरट्यांनी पळवले. यासोबतच कपाटातील काही रोख रक्कमही लांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. - दरम्यान घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सुनील भंडारी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. नंतर घरफोडीचा हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घरातील कपाट आणि आजूबाजूच्या परिसरातून तांत्रिक पुरावे व फिंगरप्रिंट गोळा करण्यासाठी ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. गुन्ह्याचा तपास देवपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबर, उपनिरीक्षक धनंजय मोरे, विशाल खैरनार, गणेश माळी आणि भावसार यांच्या पथकाकडून संयुक्तपणे केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात दोन संशयित चोरटे वावरताना स्पष्टपणे दिसून आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत असून, लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करून चोरीचा ऐवज हस्तगत केला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com