धुळे : टुडे पान २ साठी...अँकर
--
फोटो क्रमांक : 34691
धुळे : ‘गाव तिथे आरोग्यसेवा’ अभियानांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी २२ रुग्णांना रवाना करतेवेळी आमदार अनुप अग्रवाल. शेजारी महापौर मायादेवी परदेशी, आयुक्त नितीन कापडणीस आदी.
--
धुळ्यातील २२ रुग्ण मोतीबिंदू उपचारांसाठी रवाना
--
आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात एबी फाउंडेशनचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : ‘गाव तिथे आरोग्यसेवा’ या अभियानांतर्गत आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आणि एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे यांच्या परिश्रमातून निवड करण्यात आलेल्या २२ रुग्णांना मान्यवरांच्या उपस्थितीत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आले. अंधुक झालेल्या डोळ्यांना पुन्हा प्रकाशाची आशा आणि गरजू रुग्णांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याच्या उद्देशाने एबी फाउंडेशनच्या वतीने सेवाभावी पुढाकार घेण्यात आला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे डोळ्यांचे उपचार घेणे शक्य नसलेल्या रुग्णांसाठी हा उपक्रम आधार ठरत असून, नागरिकांनी या आरोग्यसेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले आहे.
-
महापालिका आणि एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राऊळ वाडी, मिल परिसर येथील महापालिका रुग्णालय येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. या उपक्रमाला ‘तुळसी आय हॉस्पिटल’चे सहकार्य झाले. शिबिरात नागरिकांची नेत्रतपासणी करून मोतीबिंदूचे निदान करण्यात आले व ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, अशा रुग्णांची पुढील उपचारांसाठी निवड करण्यात आली. या शिबिरातून निवड झालेल्या २२ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या वेळी आमदार अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर जयश्री अहिरराव, नगरसेवक बंटी मासुळे, नगरसेविका सुरेखा उगले, ललित माळी, धीरज जगताप, प्रवीण अग्रवाल, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, बाजार समितीचे सभापती योगेश पाटील आदी उपस्थित होते.