मनपा स्वच्छता मोहीम

मनपा स्वच्छता मोहीम
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी...मेन --- फोटो क्रमांक : 35013 धुळे : दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनानंतर नागरिकांनी नदीकिनारी ठेवलेल्या लक्ष्मीमूर्ती व पूजन साहित्याचे संकलन करताना महापालिकेचे कर्मचारी. --- दिवाळीनंतर महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम अतिरिक्त वाहनांद्वारे कचरा संकलन; निर्माल्य, मूर्तींचे हत्तीडोहात विधिवत विसर्जन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : दिवाळी सणानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर उडालेला फटाक्यांचा कचरा, खरेदीच्या काळात बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी आणि त्यामुळे जागोजागी साचलेला अतिरिक्त कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागामार्फत ही मोहीम सध्या शहरात राबविली जात आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली. परिणामी, शहराच्या विविध भागांमधील मुख्य रस्ते, प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये फटाक्यांचे अवशेष, कागद, प्लॅस्टिक, तसेच इतर कचरा मोठ्या प्रमाणावर साचला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही कचरा संकलनाचे काम सुरूच ठेवले होते. नियमित घंटागाड्यांसोबतच अतिरिक्त वाहनांची विशेष व्यवस्था करून शहराच्या सर्वच भागातून कचरा गोळा करण्यात येत आहे. विशेषतः रात्रीच्या सत्रात मुख्य बाजारपेठेत अतिरिक्त घंटागाडी उभी केली जात असून, व्यापारी आणि व्यावसायिकांकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे त्वरित संकलन केले जात आहे. यामुळे शहरातील बाजारपेठांची स्वच्छता कायम राखण्यास मदत होत आहे. महापालिका आयुक्त कापडणीस, उपायुक्त निकम यांच्या मार्गदर्शनात दोन मुख्य स्वच्छता निरीक्षक, १९ स्वच्छता निरीक्षक, ४० मुकादम आणि आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या समन्वयामुळेच कचऱ्याची समस्या तातडीने नियंत्रणात आणली जात आहे. मूर्तींचे विधिवत विसर्जन दिवाळीनिमित्त अनेक नागरिकांनी नदीकिनारी लक्ष्मीमूर्ती व पूजन साहित्य ठेवले होते. या सर्व मूर्तींचे व निर्माल्य साहित्याचे महापालिकेच्या विशेष निर्माल्य वाहनाद्वारे संकलन करण्यात आले. धार्मिक विधी व परंपरेचा पूर्ण मान राखून या सर्व मूर्तींचे हत्तीडोह येथे विधिवत विसर्जन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. --- १४-१ चौकट नागरिकांना सहकार्याचे आवाहन शहर सुंदर, स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, घरातील ओला व सुका कचरा केवळ घंटागाडीतच टाकावा आणि धुळे शहर स्वच्छ ठेवण्याच्या या अभियानात महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.