धुळ्यात विविध उपक्रम

धुळ्यात विविध उपक्रम
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.... -- सेवा संकल्प अभियाना अंतर्गत धुळ्यात विविध उपक्रम -- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने स्वच्छता मोहिमेस वृद्धाश्रमात कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ : सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने ‘माझे योगदान, सेवेसाठी’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर सेवा आणि स्वच्छतेचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबवण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम घेतले जात आहेत. जिल्हा क्रीडा संकुल परिसर आणि गरुड मैदानावर राबवलेल्या स्वच्छता मोहिमेची प्रार्थना आणि ‘एकता’ व ‘सेवा- भक्ती’च्या संदेशाने सुरुवात झाली. स्काउट्स ॲन्ड गाईड्स आणि कन्या शंकरलाल विद्यालयाच्या १२७ विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. निवृत्त अधिकारी सुरेश सोनवणे, श्री. भामरे, श्री. रायते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील यांनी स्वागत केले. श्रीमती निर्मला यांनी अभियानाची माहिती दिली. योगेश दिवारे आणि पायल भिजी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मेवार कावडे, कमळाबाई, इपाली बोटुसे, सूर्यवंशी पुनरणा, अतिमिपायल, पूजा, वर्गशिक्षिका प्रियांका अग्रवाल आदी उपस्थित होत्या. - वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या देखरेखीत मातोश्री वृद्धाश्रमात कार्यक्रम झाला. श्रीधर कोठावदे व आर. बी. भामरे यांच्या मार्गदर्शनात वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी स्वच्छताविषयक कवितांचे सादरीकरण, देशभक्तीपर भावना व्यक्त करणे, रहिवाशांना उद्देशून प्रवचन आणि प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सांगता झाल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com