राम भदाणे : KPD26B13614
---------
धुळे ग्रामीणमधील
सुविधांसाठी पाच कोटी
कापडणे, ता. ७ : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने धुळे ग्रामीण मतदारसंघातील व धुळे उपनगरांतील मूलभूत सोयी- सुविधांच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार राम भदाणे यांनी दिली.
आमदार भदाणे यांनी धुळे मतदारसंघातील व धुळे शहरातील उपनगर व कॉलनीनिहाय मंजूर कामांची माहिती दिली. यात धुळे महानगरपालिका क्षेत्रातील चितोड येथे महानगरपालिकेचे सभामंडप बांधण्यासाठी ३० लाख, बोरसे नगर ओपन स्पेस येथे सभामंडप बांधण्यासाठी ३० लाख, राजाराम नगर येथे सभामंडप करण्यासाठी ३० लाख, मोराणे प्र. ल. येथे गावांतर्गत सभामंडपासाठी ३० लाख, भिवसन नगर ओपन स्पेस येथे सभामंडपासाठी ५० लाख, राजेंद्र नगर येथे सभामंडपासाठी ३० लाख, नकाणे येथे गावांतर्गत सभामंडपासाठी ५० लाख, वरखेडे गावांतर्गत सभागृह व व्यायामशाळेसाठी ५० लाख, धनदाई नगर, गोंदूर रस्त्यालगत सभामंडपासाठी ३० लाख, बिजली नगर/ गोंदूर रोड ओपन स्पेसमध्ये सभामंडपासाठी ३५ लाख, औदुंबर सोसायटी येथील ओपन स्पेसमध्ये सभामंडपासाठी ३० लाख, विद्युत प्रभा कॉलनी, भूमिका लॉण्ड्री जवळ ओपन स्पेस येथे सभामंडपासाठी ३० लाख, बाळापूर गावांतर्गत सभामंडपासाठी ३० लाख, महिंदळे येथे गावांतर्गत सभामंडपासाठी २० लाख, तर अनिरुद्ध नगर येथे सभामंडपासाठी २५ लाख. या पंधरा कामांसाठी पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.