हसन खाँ पठाण : SGR26B07619
--------
धुळे जिल्हा काँग्रेसची
कार्यकारिणी जाहीर
सोनगीर, ता. २७ : काँग्रेसची धुळे जिल्हा (ग्रामीण) नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांनी सादर केलेल्या जिल्हा काँग्रेस समिती कार्यकारिणीच्या प्रस्तावास प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिली. तसे पत्र वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष युवराज करनकाळ यांना पाठवले आहे.
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी गुलाबराव कोतेकर, मनोहर पाटील, विश्वास बागूल, भगवंतराव सोनवणे, पद्माकर देशमुख, दीपक साळुंखे, ओंकार जाधव, प्रवीण कोळी, खजिनदारपदी परिश्रित देशमुख, सरचिटणीसपदी बळीराम राठोड, जसपाल सिसोदिया, खंडेराव भदाणे, उत्तम देशमुख, कमलाबाई पाटोळे, अभिमन भोई, हसन खाँ पठाण, युसूफ सैय्यद, शांताराम राजपूत, सचिवपदी गणेश गावित, संदीप भोये, प्रवीण कोळी, महेश रमण कोरडे, सलिम खान सरफराज खान पठाण, शांताराम बिरारीस, अविनाश पाटील, जगन्नाथ बैसाणे, मनोज कुवर, सदस्यपदी रतिलाल पाटील, प्रशांत पाटील, नवीन देसले, किसन वळवी, ओंकार राऊत, कैलास ठाकरे, रामसिंग पावरा, संजय पटेल, रामदास फुलमाळी, अमोल शिरसाठ, रेवसिंग पावरा, नासीग अय्युब शेख आदींची निवड करण्यात आली.