धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 31244
धुळे : नवनाथ नगरमधील पूर्ण झालेल्या बांधकामाचा रस्त्यावर पडून असलेला सिमेंट, वाळू व टाकाऊ कचरा.
--
बांधकाम कचऱ्यामुळे
स्थानिकांच्या जीवाला धोका
--
राहिवाश्यांची आयुक्तांकडे कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : शहरातील नवनाथ नगर परिसरातील एका बांधकामामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. सर्वे क्र. ७६/१/३ मधील प्लॉट क्रमांक १८ चे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, संबंधित मालकाने रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट, वाळू व उरलेला कचरा तसाच पडून ठेवल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
ओम नगरमधील रहिवासी जितेंद्र वासुदेव साळुंखे व योगिता जितेंद्र साळुंखे यांनी महापालिका आयुक्तांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. या कचऱ्यामुळे परिसरात सर्प आणि मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शासनाचे सेवा संकल्प अभियान सुरू आहे. त्यामुळे संबंधित प्लॉट मालकाकडून परिसर साफ करून घ्यावा, अन्यथा महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांमार्फत तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी श्री. साळुंखे यांनी केली आहे.