न्यायालयात बॉम्बची अफवा

न्यायालयात बॉम्बची अफवा
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 34334 धुळे : बॉम्बच्या धमकीनंतर जिल्हा न्यायालयात श्‍वानपथकाव्दारे तपासणी करताना पोलिस पथक. -- जिल्हा न्यायालयात बॉम्बची अफवाच -- यंत्रणेचा सुस्कारा : धमकीनंतर शोध पथकाकडून तपासणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ : येथील जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर सोमवारी (ता. २) दुपारी पोलिस यंत्रणा सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी तीनच्या सुमारास संपूर्ण न्यायालयीन इमारत रिकामी करण्यात आली. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. नंतर पोलिस अधिकारी, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वानपथकाने इमारतीची तपासणी केली. सरतेशेवटी बॉम्बविषयी निव्वळ अफवाच निघाल्याने संबंधितांनी सुस्कारा टाकला. पोलिसांकडून जिल्हा न्यायालयातील विविध कक्ष, न्यायाधीशांची दालने, वकील कक्ष आणि कार्यालयीन विभागांची तपासणी करण्यात आली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर दुपारी तीनच्या सुमारास धमकीचा संदेश प्राप्त झाला. न्यायालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना त्याची माहिती दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात बंदोबस्त वाढविला. न्यायालयात प्रवेशावर निर्बंध घालत सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी पूर्ण केली. या कारवाईमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. न्यायालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली. राज्यात ठिकठिकाणच्या न्यायालयास असा ई- मेल प्राप्त झाल्याने यंत्रणा सतर्क झाली. एकाच दिवशी अनेक न्यायालयांना धमकीचे संदेश पाठविण्यामागे एकच व्यक्ती किंवा यंत्रणा आहे का, याचा तपास सुरू आहे. ई- मेलचा स्रोत आणि पाठविणाऱ्याची ओळख शोधण्यासाठी सायबर यंत्रणेची मदत घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.