धुळे बेमुदत संप सुरू

धुळे बेमुदत संप सुरू
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी --- फोटो क्रमांक ः 35254 धुळे ः जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाद्वारे घोषणाबाजी करताना न्यायालयीन कर्मचारी. --- न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू सुधारित वेतनश्रेणीसाठी लढा; जिल्हा वकील संघाकडून पाठिंबा जाहीर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ ः प्रलंबित मागण्या आणि उच्च न्यायालयाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता. १७)पासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर चारही प्रमुख संघटनांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. या आंदोलनाला धुळे जिल्हा वकील संघानेही पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील न्यायालयांमधील सव्वातीनशे कर्मचारी संपात सहभागी आहेत. दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना २० पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ ला राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र, तब्बल २२ महिने उलटूनही शासनाकडून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी काळ्या फिती लावून लाक्षणिक आंदोलने केली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने अखेर १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याची वेळ आल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या संपात लघुलेखक संघटना, वर्ग-क संघटना, बेलिफ संघटना आणि वर्ग-ड संघटनांचे पदाधिकारी तसेच महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कामकाजावर परिणाम आंदोलनात लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, उपाध्यक्ष निलिमा भालेराव, सचिव नीलेश इंगळे; वर्ग-क संघटनेचे अध्यक्ष सुनील जिरे, उपाध्यक्ष मनोज मिठसागर, सचिव मनोज अहिरराव; बेलिफ संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत डोमाडे, उपाध्यक्ष संजय माळी, सचिव अंजुम शेख; तसेच वर्ग-ड संघटनेचे अध्यक्ष पंकज पुणेकर, उपाध्यक्ष कपिल चांदणे आणि सचिव तुषार गुरव यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपामुळे धुळे जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपूर्ण मनुष्यबळ आणि वाढत्या कामाच्या व्यापामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण न्यायालयाचे आणि शासनाचे लक्ष लागले आहे. --- १४-१ चौकट वकील संघाकडून आंदोलनाला बळ न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या या सनदशीर आंदोलनाला धुळे जिल्हा वकील संघाने पाठिंबा दिला आहे. संघाचे अध्यक्ष राहुल भामरे, उपाध्यक्ष विशाल साळवे, सचिव बळिराम वाघ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपोषण व आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांचे प्रश्न न्याय्य असून, शासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेऊन हा तिढा सोडवावा, असे आवाहन वकील संघातर्फे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.