धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- ट्रॅव्हल्समध्ये चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा धुळे : नगाव ते सायने (ता. धुळे) रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला ट्रॅव्हल्स बसने धडक दिल्यानंतर बसमधील ९० हजारांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी बसवाहक एस. डी. कोळी आणि त्याचा भाऊ, चालक आर. डी. कोळी (दोघे रा. नगाव, ता. धुळे) यांच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ट्रॅव्हल्समालक अमिनोद्दीन मोहियोद्दीन शेख (रा. चाळीसगाव) यांच्या फिर्यादीनुसार १२ ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास त्यांची संगीतम टूर्स अँड ट्रॅव्हल्सची वातानुकूलित स्लीपर बस (एमएच १९ सीव्ही २२२५) नगाव ते सायने रस्त्यावरून जात होती. त्या वेळी बसने रस्त्याकडेला उभ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यानंतर बसमधील ३० हजारांचे डिस्कसह टायर, २६ हजारांच्या २४ व्होल्टच्या दोन बॅटऱ्या, १३ हजारांचे हायड्रॉलिक जॅक व साधा जॅक, १५ हजारांचा टूल किट बॉक्स आणि सहा हजारांचे दोन कॅमेरे असे साहित्य चोरीला गेले, अशी तक्रार आहे. -- आदेशाचे उल्लंघन; दोघांविरुद्ध गुन्हा धुळे : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून विनापरवानगी तमाशा आयोजित केल्याप्रकरणी खलाणे (ता. शिंदखेडा) येथील पंढरीनाथ ईशी आणि बोराडी (ता. शिरपूर) येथील सुकलाल बोराडीकर, राधेश्याम बोराडीकर यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बारा ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास खलाणे येथील बसस्थानकासमोरील मोकळ्या जागेत हा तमाशा सुरू होता. पोलिस अंमलदार रवींद्र ईशी यांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई झाली. -- दोन बैलांची चोरी; ४० हजारांचे नुकसान धुळे : वारुड (ता. शिंदखेडा) येथे शेतकऱ्याच्या घराच्या अंगणात बांधलेले ४० हजारांचे दोन बैल चोरीला गेले. मुकेश युवराज पाटील यांच्या अंगणातील बैल चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यांच्या फिर्यादीनुसार नरडाणा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -- वीज कंपनीची तार चोरीची तक्रार धुळे : तामथरे (ता. शिंदखेडा) रस्त्यावरील वीज खांबावरून ३४ हजारांची ल्युमिनिअम तार चोरट्यांनी नेली. वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता महेंद्रकुमार भामरे यांच्या तक्रारीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com