KPD26B13543
धुळे : सायकलिंक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी.
-----
जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत ‘सिस्टेल’ अजिंक्य
तनूष अहिरे, खुशी चौधरी, अदिती मोरे, मेघना चव्हाण यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. २१ : धुळे शहरात शालेय जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धा नुकतीच झाली. सिस्टेल विद्यालयाचा तनुष दिनेश अहिरे याने चमकदार कामगिरी करुन प्रथम क्रमांक मिळविला. त्याने १४ वर्ष वयोगटाबरोबर १७ वर्ष वयोगटातही तनुष अहिरे अजिंक्य ठरला. तर १९ वर्ष वयोगटात उपविजेता झाला. तो दोन गटात जिल्हास्तरावर प्रथम आल्याने विभागीयस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. खुशी चौधरी, अदिती मोरे व मेघना चव्हाण यांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व धुळे जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य खेळाडूंनी चुरशीचे खेळ दाखवले. यात १४, १७ व १९ वर्षाच्या आतील वयोगटात मुला व मुलींनी सहभाग नोंदवला. तनुष अहिरे याने प्रथम क्रमांक, आशिष सूर्यवंशी व चैतन्य धनगर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. खुशी चौधरी, अदिती मोरे, मेघना चव्हाण यांनी प्रथम क्रमांक व मृण्मयी राजपूत, देवश्री पुरोहित यांनी द्वितीय क्रमांक पटकावले. त्यांची विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमंत घरटे, सचिव हंसराज पाटील, प्रशासक सुवर्णा घरटे, मुख्याध्यापिका दिव्या के. एस. व क्रीडाशिक्षक पंकज राजपूत आदींनी कौतुक केले.