धुळे ः टुडे १ साठी
--
धुळ्यात ७० हजारांची लूट;
मैंदाण्यात दागदागिने लंपास
जिल्हा पोलिस दलापुढे तपासाचे आव्हान
---
किंवा
मैंदाणेत दिवसा दागदागिने लंपास
सव्वादोन लाखांची लूट; धुळ्यातही ७० हजारांची लूट
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ ः शहरात वर्कशॉपचे कुलूप तोडून ७० हजारांची रोकड, तर मैंदाणे (ता. साक्री) येथे भरदिवसा दोन लाखांहून अधिकचा ऐवज लंपास करण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धुळे शहरातील मालेगाव रोडवरील होंडा शोरूमजवळ असलेल्या इंजिनिअरिंग बी. टी. वर्कशॉपमध्ये १२ ते १३ नोव्हेंबरदरम्यान चोरीची घटना घडली. चोरट्यांनी वर्कशॉपचे मुख्य कुलूप, तसेच आतील गुदामातील कपाट आणि तिजोरीचे लॉक तोडून ७० हजार रुपयांची रोकड लांबविली. याप्रकरणी अरुण मंडू वाघ (वय ६२, रा. मुकुंद कोळवलेनगर, मालेगाव रोड, धुळे) यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार लोहार तपास करीत आहेत.
पिंपळनेर पोलिस ठाणे
मैंदाणे येथे १३ नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसात यादरम्यान घरफोडीची दुसरी घटना घडली. अनिल राजाराम खैरनार (वय ५०, रा. मैंदाणे, ता. साक्री) यांच्या बंद घराची कडी-कोंडा आणि दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून एक लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ७० हजार रुपयांची रोकड, असा एकूण दोन लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी खैरनार यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.