धुळे दुष्काळाचा सामना

धुळे दुष्काळाचा सामना
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- फोटो क्रमांक ः 31649 धुळे : बैठकीस उपस्थित जयकुमार रावल, भाग्यश्री विसपुते -- पाणी, चारा, रोजगाराचा आराखडा तयार ठेवा - पालकमंत्र्यांचे यंत्रणांना निर्देश : नियोजन, अंमलबजावणीतून दुष्काळाचा सामना सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामीण नागरिकांना आगामी काळात पाणी, चारा अथवा रोजगारासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे वेगाने पूर्ण करणे, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब ऑगस्ट २०२७ पर्यंत जपून वापरणे आणि संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी पर्यायी व्यवस्था आधीच निश्चित करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले. --------- जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता. ७) जिल्हास्तरीय दुष्काळ निवारण व पाणी आरक्षण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे सीईओ बाबासाहेब बेलदार, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल, पशुसंवर्धन विभागाचे गिरीश पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मधुर ढोले, प्रांताधिकारी रोहन कुंवर, शरद मंडलिक, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत आदी उपस्थित होते. - मंत्र्यांचे मुख्य निर्देश पालकमंत्र्यांचे निर्देश असे : धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा हे चारही तालुके पावसाच्या खंडामुळे ‘ट्रिगर-१’च्या निकषांत आले असून, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी पंचनाम्याचे काम मिशन मोडवर पूर्ण करावे. सहा ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात ३४.५० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ८१.३ टक्के पाऊस झाला आहे. सध्याचा पाणीसाठा पाहून निर्धास्त न राहता ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे आरक्षण आणि पर्यायी स्रोत निश्चित करावेत. -- आराखडा तयार ठेवा सद्यःस्थितीत टँकरची गरज नसली, तरी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन धुळे, साक्री आणि शिंदखेड्यातील ४९ गावे व ८ वाड्यांसाठी ४१ टँकरांचे नियोजन करण्यात आले आहे. पाण्याची गरज भासल्यास प्रशासकीय प्रक्रियेत विलंब होऊ नये, यासाठी गावनिहाय विहीर अधिग्रहण व पर्यायी व्यवस्था आधीच ठरवावी. पशुधनासाठी वैरण विकास योजनेतून मका- ज्वारी बियाणे वाटप, नेपिअर लागवड आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर भर देऊन अतिरिक्त हिरवा चारा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. दुष्काळी स्थितीत शेतमजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मागणीनुसार तातडीने सुरू करावीत. गावात मागणी आल्यास प्रक्रियेत वेळ घालवू नये. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळताना अडचणी येऊ नयेत म्हणून ई-पीक पाहणी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीतील त्रुटी दूर करून महसूल व कृषी विभागाने समन्वयाने काम करावे. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com