टुडे पान २ साठी.. अवतीभवती

टुडे पान २ साठी.. अवतीभवती
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. अवतीभवती --- न्यू सिटी शाळेत आपत्ती सज्जता धुळे : शासनाच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार किसनराव सोनूजी करनकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे ‘आपत्ती व्यवस्थापन व सज्जता’ या विषयावर व्याख्यान झाले. नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुंबईचे प्रशिक्षक आर. एस. कुरेशी कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची माहिती देऊन आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याविषयी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक एन. व्ही. नागरे अध्यक्षस्थानी होते. उपमुख्याध्यापक एस. व्ही. भामरे, पर्यवेक्षक डॉ. एन. यू. बागूल, क्रीडाशिक्षक के. बी. पालवे उपस्थित होते. सुरुवातीला नितीन ठाकूर यांनी परिचय करून दिला. एनसीसी ऑफिसर एस. टी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक नागरे यांनी मार्गदर्शन केले. --- अग्रसेनजी विद्यामंदिरात क्रीडामहोत्सव उत्साहात धुळे : साक्री रोड येथील श्री अग्रसेनजी महाराज प्राथमिक विद्यामंदिरात श्री अग्रसेनजी महाराज जयंतीनिमित्त झालेल्या क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. डॉ. संजय अग्रवाल यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या १३४ गुणवंत विद्यार्थ्यांना शिल्ड, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव ॲड. योगेश अग्रवाल, संचालिका प्राची अग्रवाल, संचालक नरेश अग्रवाल, संचालक मनोहर अग्रवाल, बापू पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश मोरे उपस्थित होते. --- जिल्ह्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा धुळे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरसह जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपर्यंत पोहोचल्याने उन्हाचा तीव्र ताण जाणवत आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा एल निनोच्या प्रभावामुळे तापमान पाच अंशांनी वाढले आहे. दुपारच्या वेळी नागरिक उकाड्याने त्रस्त होत असून, रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. रात्री मात्र तापमानाचा पारा खाली येत असल्याने काहीसा दिलास मिळत आहेत. --- न्याहळोद विद्यालयात वन्यजीव सप्ताह धुळे : न्याहळोद (ता. धुळे) येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामाजिक वनीकरण वनक्षेत्र धुळे विभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम झाला. विभागीय वनाधिकारी राधिका फलपले, सहायक वनसंरक्षक कौतिक डुमसे आणि महेश पाटील यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक सुनील साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानवी जीवनात वन्यजीवांचे महत्त्व, अन्नसाखळीतील त्यांची भूमिका, वन्यजीव संरक्षण व संगोपन, पर्यावरणाचे फायदे, मानव-वन्यजीव संघर्ष आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज यावर त्यांनी माहिती दिली. विद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पाटील, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. श्री. गिरासे यांनी आभार मानले. --- साक्री रोडवर उंच गतिरोधक जीवघेणे धुळे : शहरातील साक्री रोडवरील पॉवर हाऊस ते सुरत बायपासदरम्यान वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी उभारलेले गतिरोधक वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. अनेक ठिकाणी गतिरोधकांची उंची नियमापेक्षा जास्त असून, त्यावर धोक्याची सूचना देणारे पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गतिरोधक न दिसल्याने वाहने आदळून अपघाताची शक्यता वाढली आहे. हे गतिरोधक दुरुस्त करून पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com