धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 33715
धुळे : शेतमाल, पशुधन चोरी प्रकरणातील अटक झालेल्या संशयितांसोबत तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार.
--
शेतमाल, पशुधन चोरटे गजाआड
-
धुळे तालुका पोलिसांकडून सव्वालाखांवर मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : शेतातील कापूस, पशुधन आणि इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या दोघा संशयितांना धुळे तालुका पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून गाय, इन्व्हर्टरची बॅटरी, इलेक्ट्रिक मोटार, कार व ५० किलो कापूस, असा एकूण १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतमाल आणि पशुधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीवरून संशयितांचा शोध घेतला. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
याप्रकरणी कुणाल रवींद्र मोरे (वय २१, रा. कालिकादेवी नगर, गोळीबार टेकडी रोड, धोबी घाट परिसर, धुळे) आणि शब्बीर शाह सुलेमान शाह (वय ३९, रा. कबीरगंज, पाण्याच्या टाकीजवळ, पेठवाली मशीद परिसर, धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, रवींद्र माळी, संजय जाधव, रवींद्र सोनवणे, राहुल देवरे, विनोद आढावे, सुधीर शिरसाळे, प्रमोद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.