धुळे : टुडे पान १ साठी... मेन
--
फोटो क्रमांक : 33954
धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी राम भदाणे, भाग्यश्री विसपुते, बाबासाहेब बेलदार, विशाल आनंद, नितीन कापडणीस, शरद पवार आदी.
--
दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली नको
--
पालकमंत्री रावल : जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : दुष्काळाच्या कठीण काळात शेतकऱ्यांवर बँकांनी सक्तीची कर्जवसुली करू नये. खासगी सावकारांच्या छळाविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा या चारही तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते.
-
आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-
पाणी, चाराचे नियोजन करा
जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ८२ टक्के पाऊस झाला असून चारही तालुक्यांत पावसाचा खंड पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रावल यांनी आगामी उन्हाळा आणि ऑगस्ट २०२७ पर्यंतची संभाव्य परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक गावाचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. पिण्याच्या पाण्यासाठी आणि पशुधनाच्या चाऱ्यासाठी आजपासूनच काटकसरीचे व प्रभावी नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर काम उपलब्ध व्हावे, यासाठी रोजगार हमी योजना आणि जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे आदेश त्यांनी दिले. वनक्षेत्रातील वृक्षलागवड आणि भूजल पातळी वाढविण्याच्या कामांना प्राधान्य देण्यासही त्यांनी सांगितले.
-
शेतकरी कर्जमुक्तीला गती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यात ३६ हजार ३९० पात्र शेतकऱ्यांपैकी २९ हजार ३३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित प्रलंबित प्रकरणे व तक्रारी तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून दुष्काळग्रस्तांना प्रत्यक्ष दिलासा मिळवून द्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
-
१४-१
..चौकट..
१४-१
दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा
दुष्काळाच्या सावटाखाली दिवाळी साजरी करणाऱ्या गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी, धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यांत मोफत आनंदाचा शिधा व अन्नधान्याचे वाटप चार नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पुरवठा विभागाला दिले. तसेच, पिकांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून एकाही पात्र शेतकऱ्याला शासकीय मदतीपासून वंचित ठेवू नका, असे त्यांनी बजावले.
-