धुळे : टुडे १ साठी, ॲंकर
--
अडीच लाखांवर शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर
-
दिवाळीपूर्वी साडेतीन लाखांवरील बॅंक खात्यात पाच हजार होणार जमा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ६५ हजार ११ पैकी आतापर्यंत दोन लाख ३९ हजार ८७३ शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर यशस्वीरित्या अपडेट (अप्रूवल) झाली आहेत. येत्या एक-दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष मदत जमा होण्याची शक्यता असून, यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाला आर्थिक दिलासा मिळू शकणार आहे.
-
जिल्ह्यात पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या काळात पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप पिके हातातून गेली आहेत. परिणामी, जिल्ह्यातील चारही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून खरीपाची पिके पूर्णपणे हातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्व गावांतील सुधारित पैसेवारी ५० पैशांच्या आत नोंदवली गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली ही अग्रिम मदत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
-
अप्रूवलचे काम सुरूच
दरम्यान, या प्रक्रियेत कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागातर्फे दक्षता घेतली जात आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करून सर्वच नावांची जलद नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. या मदतीमुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोर्टलवर नावे अप्रूवल करण्याचे काम अजूनही सुरूच राहणार असून उरलेल्या पात्र शेतकऱ्यांची नावेदेखील आगामी दोन दिवसांत पोर्टलवर अपडेट केली जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळून यंदाची दिवाळी साजरी करणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
तालुकानिहाय अप्रूवल शेतकरी संख्या
तालुका ----------------- एकूण शेतकरी ---------------- अप्रूवल मिळालेले शेतकरी
साक्री --------------------- १,२३,१२५ ----------------------- ६९,१२६
धुळे ---------------------- ९३,०८० ------------------------- ६७,७१५
शिंदखेडा ------------------- ८३,२१६ ------------------------ ६६,९६९
शिरपूर --------------------- ६५,५९० ------------------------- ३६,०६३
एकूण ---------------------- ३,६५,०११ ----------------------- २,३९,८७३