कुसुंबा झोपडी आग

कुसुंबा झोपडी आग
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. -- फोटो क्रमांक : 32914 कुसुंबा (ता. धुळे) : आगीत जाळून राख झालेल्या भिलाटी परिसरातील जावईनगर येथील झोपड्या. -- आगीत तीन कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त -- कुसुंब्यात संसारोपयोगी साहित्य, धान्य व किराणा मालाची मदत सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ : कुसुंबा (ता. धुळे) येथील कळंबेश्वर भिलाटी परिसरातील जावईनगर येथे तीन झोपड्यांना लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत श्यामराव भटू भिल, कैलास धाकू भिल आणि बापू श्यामराव भिल या तीन कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील यांच्या पुढाकाराने तातडीने मदत करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पाटील यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून पीडित कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तहसीलदारांच्या निर्देशानुसार तलाठ्यांनी घटनास्थळी पंचनामा करण्याची कार्यवाही केली. आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना तातडीने आधार देण्यासाठी परिवर्तन पॅनलच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार तिन्ही कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य, बाजरी, गहू, तांदूळ, विविध कडधान्ये, स्वयंपाकाची स्टीलची भांडी आणि पाच ते सहा दिवस पुरेल इतका किराणा माल देण्यात आला. संकटाच्या काळात केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदत करून पीडित कुटुंबांना सावरण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com