धुळे टुडे २ साठी मेन...
---
फोटो-NSK26H32488
धुळे : सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थ तपासणीसाठी विशेष मोहीम राबवा यासह विविध मागण्यांबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना शिवसेनेचे सतीश महाले, संजय वाल्हे व इतर पदाधिकारी. सोबत कार्यकर्ते.
---
अन्नपदार्थ तपासणीसाठी विशेष मोहीम राबवा
---
शिवसेनेची मागणी; सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : सध्या विविध सण- उत्सव सुरू आहेत. या काळात नागरिकांकडून मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र, नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि त्यांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली.
याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की धुळे शहराच्या विविध भागांमध्ये फिरत्या आईस्क्रीम विक्री करणाऱ्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या गाड्यांकडे नियमानुसार आवश्यक परवाने किंवा नोंदणी आहे का तसेच विक्री करण्यात येणारे आईस्क्रीम, लस्सी, कुल्फी, फालुदा व रबडी यांसारखे थंड पदार्थ दर्जेदार, सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने साठवले जातात का याची कसून तपासणी करण्यात यावी.
कठोर कारवाई करावी
तसेच, आगामी सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मिठाई दुकानांमधील मिठाई, मावा, खवा व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, शुद्धता, उत्पादन आणि एक्सपायरी डेट तसेच साठवणूक व स्वच्छतेची सखोल तपासणी करावी. अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास किंवा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर व कठोर कारवाई करावी, अशी मागणीही शिवसेनेने केली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची अन्न व औषध प्रशासन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले, महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्यासह समाधान शेलार, मच्छिंद्र निकम, बबलू शेख, आबा कदम, भूषण ठाकरे, संजय कुसळकर, मिलिंद चौधरी, किरण आगलावे, केतन जाधव, सिद्धार्थ करनकाळ, विष्णू जावडेकर, प्रतीक शिंदे, भटू भोपे, वैभव खोपडे, देवा गायकवाड, प्रफुल सोनवणे, अरुण सूर्यवंशी, सुनील वाल्हे, शुभम जगदाळे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
---