दीड कोटींचे भेसळयुक्त

दीड कोटींचे भेसळयुक्त
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- फोटो क्रमांक ः 34669 व 34670 धुळे : अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी फराळ आणि अन्नपदार्थांच्या तपासणीदरम्यान जप्त केलेल्या साठ्याची पाहणी करताना. -- दीड कोटींचे भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा जप्त - धुळे अन्न व औषध प्रशासनाची जिल्ह्यात धडक कारवाई; १७ परवाने निलंबित सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान राबविलेल्या धडक मोहिमेत तब्बल एक कोटी ५५ लाख ४१ हजार ५६९ रुपये किमतीचे भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्न सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. - दिवाळीत मिठाई, फराळ व अन्य पदार्थांची मागणी वाढल्याने गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत एकूण १३९ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. - १४-१ कारवाई अशी अन्नपदार्थ जप्ती : जिल्ह्यातील २१ ठिकाणांहून मिरची पावडर, हळद पावडर, खाद्यतेल, बर्फी, सोनपापडी व फरसाण, असा एकूण ९२ लाख २२ हजार ९४८ रुपयांचा (४० हजार ५२५ किलो) साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित गुटखा जप्त : सहा वेगवेगळ्या ठिकाणाहून ६३ लाख १८ हजार ६२१ रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व अन्य प्रतिबंधित पदार्थांची ३४ हजार ८१६ पाकिटे जप्त करण्यात आली. - १४-१ तडजोड शुल्क वसूल अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. यात उत्पादनस्थळी स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे पालन न केल्याप्रकरणी १३, तर असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ४, अशा एकूण १७ व्यावसायिकांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८ प्रकरणांतून १ लाख ७४ हजार ५०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले असून, न्यायनिर्णयासाठी ८ प्रकरणांचे प्रस्ताव नाशिक सहआयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. - १४-१ विक्रेत्यांची तपासणी सणासुदीच्या काळात फराळाचे उत्पादन व विक्री करणाऱ्या हंगामी विक्रेत्यांच्या ठिकाणांचीही कसून तपासणी केली जात आहे. चकली, लाडू, करंजी, चिवडा व शंकरपाळी तयार करणाऱ्या विक्रेत्यांकडील कच्चा माल आणि तयार फराळाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, ही मोहीम यापुढेही अशीच कडक सुरू राहणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांचा आदेश आणि सहआयुक्त मंगेश माने, सहायक आयुक्त गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत, मंगेश भावसार यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. - १४-१ ...चौकट... १४-१ ग्राहकांसाठी विशेष जागृती आवाहन * नेहमी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच मिठाई व खाद्यपदार्थांची खरेदी करावी. * खरेदी करताना पॅकिंगवरील उत्पादन दिनांक आणि वापरण्याची अंतिम मुदत तपासावी. * दुधापासून तयार केलेली मिठाई विक्रेत्याच्या सूचनेनुसार साधारणतः दोन ते तीन दिवसांतच संपवावी. * बंगाली मिठाई शक्यतो खरेदीच्या दिवशीच खावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.