धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 35201
धुळे : गांधी पुतळा ते पाट रस्ता परिसरातील प्रसाधनगृहाजवळ साचलेला कचऱ्याचा ढीग आणि उघडे पडलेले धोकादायक चेंबर.
---
गांधी पुतळा ते पाट रस्ता
अतिक्रमणाच्या विळख्यात
चेंबरमुळे अपघाताची भीती; नागरिकांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : शहरातील मध्यवर्ती गांधी पुतळा चौकातून पाट रस्त्याकडे, तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाला सध्या अतिक्रमण, कचरा आणि निकामी साहित्याचा विळखा पडला आहे. यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
आग्रा रोडवरील गांधी पुतळा परिसरात महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मात्र तेथील टपरी व हातगाडीधारकांनी आपले साहित्य थेट या पाट रस्त्यावर आणून ठेवले आहे. भविष्यात येथे कायमस्वरूपी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तसेच रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग आणि पडून असलेल्या निकामी मशिनरीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरील पुरुष प्रसाधनगृहाजवळील चेंबर उघडे असल्याने अपघाताची शक्यता आहे. दुसरीकडे येथील महिला प्रसाधनगृह दुरवस्थेमुळे असून नसल्यासारखेच झाल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.