धुळे टुडे २ साठी...
---
घंटागाडी कामगारांचे वेतन,
पीएफ दिवाळीपूर्वी अदा करा
---
विजय पवार; कामगार अधिकाऱ्यांसोबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १९ : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाड्यांवर काम करणाऱ्या कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन आणि आठ महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) थकीत आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी अदा करून कामगारांची दिवाळी गोड करावी. तसेच, संबंधित कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे.
नाशिक विभागीय कार्यालयात कामगार उपआयुक्त विलास माळी आणि सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांच्यासोबत श्री. पवार यांची बैठक झाली. धुळे शहर स्वच्छ व रोगमुक्त ठेवण्यात सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनासह प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे पवार यांनी सांगितले. बैठकीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी वाटप, नूतनीकरण, आरोग्य सुविधा आणि शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. या वेळी भाजप कामगार मोर्चाचे विधी सल्लागार किशोर जाधव, जिल्हाध्यक्ष नेहा अहिरराव, सरचिटणीस अंकुश नंदवाळकर, माधुरी भावसार, योगेश कोठावदे, चंद्रकांत भामरे, वरिष्ठ उपाध्यक्ष देवीदास मिस्तरी, उपाध्यक्ष विजय शिरसाट, प्रीती परदेशी, रावसाहेब नांद्रे, किसन जाधव, भरत निकम, चिटणीस राजेंद्र गांगुर्डे, अशोक जाधव, दीपक सोनार, मेहमूद अन्सारी आदी उपस्थित होते.
---