धुळे टुडे २ साठी
---
फोटो-NSK26H31191
धुळे ः जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणीसह मान्यवर.
---
मुख्याध्यापक संघाच्या
अध्यक्षपदी संजय पवार
धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ ः जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी संजय एल. पवार यांची, तर सचिवपदी उदय तोरवणे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती झाली. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, येणाऱ्या काळात शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी मोठा लढा उभारावा लागणार आहे, त्यासाठी सर्वांनी संघटनेसाठी प्रामाणिकपणे वेळ द्यावा, असे आवाहन संघाचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी याप्रसंगी केले.
धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाची अभय विद्यालयात नुकतीच बैठक झाली. श्री. पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीत संघाच्या आगामी वाटचालीवर सविस्तर चर्चा होऊन नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष- संजय एल. पवार, सचिव- उदय डी. तोरवणे, कोशाध्यक्ष- के. आर. जाधव, उपाध्यक्ष- संजीव एच. पाटील, एस. ए. कदम, जगदीश शिंदे, के. डी. बच्छाव, विद्यासचिव- एस. के. वसईकर, सहविद्यासचिव- मोहम्मद मुर्तुझा, सहकोशाध्यक्ष- एस. डी. गिरासे, सहसेक्रेटरी- चंद्रभान पाटील, महिला प्रतिनिधी- हेमलता पाटील, संजीवनी एम. गांगुर्डे, ऑडिटर- के. व्ही. बाविस्कर, सहऑडिटर- आर. पी. पाटील, प्रसिद्धी प्रतिनिधी- राजेंद्र भदाणे, अल्पसंख्याक शाळा प्रतिनिधी- शमसुल उल हसन मोहम्मद गुफरान, पठाण इम्रान खान नझिन खान, अंशतः अनुदानित शाळा प्रतिनिधी- जयपाल देशमुख, शेखर बागूल, राम पाटील, कार्यकारिणी सदस्य ः डॉ. फारुक इस्माईल शेख, डॉ. बी. बी. पाटील, योगेश नांद्रे, लक्ष्मीकांत पाटील, विनोद बाळकृष्ण जोशी, धुळे शहराध्यक्ष- प्रवीण लाडे, धुळे तालुकाध्यक्ष-नितीन अहिरराव, साक्री तालुकाध्यक्ष- डी. एन. पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष- एम. डी. पाटील, शिरपूर तालुकाध्यक्ष- चेतन पाटील.