स्थायी समिती सभा

स्थायी समिती सभा
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, मेन --- 34559, 34560 धुळे : मनपा स्थायी समिती सभेला उपस्थित सभापती लताबाई पोतदार, हेमंत निकम, मनोज वाघ. दुसऱ्या छायाचित्रात बोलताना सदस्य अमोल मासुळे. --- कामात कुचराई झाल्यास कारवाईचा बडगा मनपा आरोग्य विभागाला इशारा; डेंगी, मोकाट श्‍वान, स्वच्छतेप्रश्‍नी पुन्हा संताप - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : मोकाट श्वान आणि डेंगीप्रश्नी धुळेकरांना वाऱ्यावर सोडले आहे. डेंगी, मलेरियाच्या उपाययोजनांसाठी महापौरांनी दिलेला आदेशही आरोग्य विभागामधील अधिकारी-कर्मचारी जुमानत नाहीत तर इतरांचे काय?, असा प्रश्न महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकाने केला, तर प्रभागांमधील साफसफाईसाठी कागदावर भरपूर कर्मचारी दिसत असले तरी प्रत्यक्षात अत्यंत कमी कर्मचारी काम करतात. आरोग्य विभागाला कीड लागली आहे. त्यामुळे ॲक्शन घ्या, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्याने केली. सदस्यांच्या या संतापावर उपायुक्तांनी कामात कुचराई केल्यास कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाला दिला. महापालिकेची स्थायी समितीची सभा गुरुवारी (ता. ५) सकाळी अकराला झाली. सभापती लताबाई पोतदार, उपायुक्त हेमंत निकम, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. जलशुद्धीकरणासाठी लागणाऱ्या तुरटी, ब्लिचिंग पावडर या रसायनांचा पुरवठा करण्याच्या २०२६-२७ व २०२७-२८ या वर्षासाठीच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय सभेपुढे होता. तो चर्चेअंती मंजूर करण्यात आला. तसेच मानधनावरील कनिष्ठ अभियंते, संगणक लिपिक, वर्ग-४ कर्मचारी, अशा एकूण नऊ कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने फेरनियुक्तीचा विषयही मंजूर करण्यात आला. - ‘ते‘ काम थांबले सत्ताधारी भाजपचे सदस्य अमोल मासुळे यांनी डेंगी, मलेरियाच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या फवारणी, धुरळणीसाठीच्या वाहनांवर कर्मचारी लावा असा आदेश महापौर मायादेवी परदेशी यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत संबंधित विभागाला दिला होता. मात्र, त्यानंतरही कार्यवाही झालेली नाही. महापौरांच्या आदेशाला यंत्रणा जुमानत नसेल तर इतरांचे काय? असा प्रश्न त्यांनी केला. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला केला. मोकाट श्वानांच्या प्रश्नावरही त्यांनी संताप व्यक्त केला. प्रशासनातर्फे स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी ठेकेदाराचे बिल प्रलंबित असणे, दोन ठेकेदारांचे भांडण अशा काही कारणांमुळे श्‍वान निर्बीजीकरणाचे काम थांबल्याचे सांगितले. - आरोग्यला कीड सत्ताधारी सदस्य कृपेश नांद्रे यांनी प्रभागात गटार स्वच्छतेसाठी फक्त चारच कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच स्वच्छता करताना पाच-पाच कर्मचारी एकाच ठिकाणी काम करतात. त्यामुळे संपूर्ण स्वच्छता होत नसल्याचा मुद्दाही मांडला. विरोधी ‘एमआयएम''चे सदस्य आमीर पठाण यांनी कागदावर ३०, तर प्रत्यक्ष कामाला दहाच सफाई कर्मचारी असतात. हजेरीच्या वेळी तर नवनवीन चेहरे दिसतात असे म्हणत आरोग्य विभागाला कीड लागली आहे, यात मोठा भ्रष्टाचार आहे असे म्हणत ॲक्शन घ्या, अशी मागणी केली. सदस्या वंदना भामरे, योगिता कुटे यांनीही सफाई कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या तक्रारी केल्या. - उपायुक्तही हतबल आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त निकम यांनी सदस्यांच्या संतप्त प्रश्नांवर उत्तर देताना स्वच्छता निरीक्षकांनी नियोजनपूर्ण काम करायला हवे, त्यांना तशा सूचनाही केल्या आहेत. मात्र, त्यांना कारवाईच हवी असेल तर आपण काय करणार, ‘नही सुधरेंगे तो मरेंगे...’, असे म्हणत जणू इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.