धुळे ः टुडे १ साठी...........शुभरात्री.....
---
बनावट मद्यसाठ्याचा पाच
लाखांवरचा मुद्देमाल जप्त
धुळ्यात साक्री रोडवर कारवाई; संशयित फरारी
-
किंवा
बनावट मद्यसाठ्याचा मुद्देमाल जप्त
धुळ्यात साक्री रोडवर कारवाई; संशयित फरारी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने साक्री रोडवरील हॉटेल काठेवाडी परिसरात छापा टाकून चारचाकी वाहनासह पाच लाख १३ हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. कारवाईपूर्वीच संशयित फरारी झाला.
बनावट देशी व विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करून विक्री केली जात असल्याची माहिती विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. झडतीदरम्यान चारचाकी वाहनात देशी मद्य, रॉकेट संत्रा, तसेच दादरा नगर हवेली, दमण व दीव येथील विदेशी मद्याचा साठा आढळला. वाहनासह एकूण पाच लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फरारी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त यू. आर. वर्मा आणि धुळे विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर, दुय्यम निरीक्षक डी. जी. गवळी, एम. डी. मोरे, मनोज धुळेकर, मयूर मोरे, दीपक अहिरराव, बाळकृष्ण सोनवणे यांनी ही कारवाई केली. अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीसंदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी विभागाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे आवाहन विभागाने केले आहे.