टुडे पान २ साठी...अवतीभवती

टुडे पान २ साठी...अवतीभवती
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी...अवतीभवती -- फोटो क्रमांक : 35028 धुळे : पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त महापालिका सभागृहात अभिवादनवेळी उपस्थित मनपाचे अधिकरी, कर्मचारी. --- नेहरू जयंतीनिमित्त मनपात अभिवादन धुळे : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त महापालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देश उभारणीतील योगदानाचे स्मरण करत उपस्थितांनी आदरांजली वाहली. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किशोर वाघ, नरेश अटलानी, हेमंत पावटे, प्रणव शिंदे, मयूर निकम, नंदू सोनवणे, वासिद पठाण आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. --- प्रश्नमंजूषा स्पर्धेत शेख फैजा प्रथम धुळे : येथील धुळे चॅरिटेबल सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. मुंबईस्थित महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या प्रायोजकत्वाखाली शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ही नुकतीच स्पर्धा झाली. स्पर्धेत डीसीएस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या शेख फैजा आणि अन्सारी हानिया या विद्यार्थिनींनी अव्वल स्थान मिळविले. या यशाबद्दल अध्यक्ष आशिष अजमेरा, उपाध्यक्ष रोहित अजमेरा, प्राचार्य डॉ. शैलेश पाटील आदींसह शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. --- उत्तरेकडील वाऱ्यांनी तापमानात घसरण धुळे : शहरात मागील तीन-चार दिवसांपासून किमान तापमान भेट १० ते १२ अंशांवर स्थिरावल्याने गारठ्यात अचानक वाढ झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. दिवाळी सणोत्सवाच्या कालावधीत सायंकाळनंतर अचानक वाढलेल्या थंडीमुळे वातावरणात बदल झाला. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानातील ही घट हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसारच नोंदवली गेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून उकड्याने त्रास झालेल्या नागरिकांना थंडीची सुरुवात झाल्याने आणि दिवसभरातील उन्हाची तीव्रता देखील काहीशी कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.