धुळे टुडे ३ साठी अँकर...
---
फोटो-NSK26H31609
धुळे : राज्य कबड्डी स्पर्धेसाठी रवाना होण्याप्रसंगी मुला-मुलींच्या संघासमवेत मान्यवर.
---
राज्य कबड्डी स्पर्धेसाठी धुळ्याचे संघ रवाना
---
मुला-मुलींच्या संघात प्रत्येकी १४ खेळाडूंचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : विरार- वसई (जि. पालघर) येथे होणाऱ्या ५३ व्या राज्य कुमार- कुमारी गट कबड्डी स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्याचा संघ रवाना झाला. या स्पर्धेपूर्वी गेल्या तीन-चार दिवसांपासून मुला- मुलींच्या संघाने क्यूमाईन क्लब येथे सराव केला.
निवड चाचणीतून प्रत्येकी २० खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यातून अंतिम १४-१४ खेळाडूंची निवड झाली. कुमारी मुलींचा संघ असा : कर्णधार- नेहा गोपाल पाटील (गुजर), गायत्री दगा कोळी, धन्वंतरी रत्नाकर पाटील, दिव्या शिवराम सोनवणे, मीनल दीपक पाटील, गेश्ना बाळू धनगर, दर्शना सुनील शिंदे, खुशी दिलीप बागूल, शीतल ओंकारसिंग गिरासे, कृपा मुकुंद शाह, निकिता प्रकाश राठोड, प्रतीक्षा सतीश चाचरे, खुशी दीपक ठाकूर व मंगिता वजऱ्या वसावे. या संघाच्या व्यवस्थापक म्हणून अश्विनी बोरसे, तर प्रशिक्षक म्हणून भूषण कोळी यांची नियुक्ती आहे.
मुलांचा संघ असा : कर्णधार- राज रवींद्र अहिरे, तुषार संतोष राठोड, अमन दगडू पिंजारी, आदित्य प्रकाश जाधव, दर्शन कैलास बोरसे, हरिश राजेंद्र तिरमले, शेख मोहम्मद अयान शेख साजिद, सुरेश दिवाणसिंग राजपूत, भाविक वासुदेव पाटील, रोहित भय्या शिंदे, युवराज नंदकुमार शिंदे, सय्यद आवेश साबीर, कुणाल दिलीप गिरासे व योगेश अमोल निकम. मुलांच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून हेमंत शिरसाठ, तर प्रशिक्षक म्हणून सुमित आढाव आणि पंच म्हणून नरेंद्र नगराळे व कल्पेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
संघाला निरोप देण्यासाठी आयोजित कार्यक्रमास धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मनोहर चौधरी, नगरसेवक सनी चौधरी, सचिव मुजफ्फर अली सैयद, कार्याध्यक्ष ॲड. रवी देसरडा, जितेंद्र ठाकरे, ॲड. प्रथमेश सोनार, देवकरप्पा गवळी, प्रतीक घडी आदी उपस्थित होते. आखिल शेख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भालचंद्र मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
---