धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 35269
धुळे : कमलाबाई शाळेजवळील पादचारी पुलाला ‘खाशाबा जाधव’ यांचे नाव द्यावे, या मागणीचे निवेदन महापौर मायादेवी परदेशी यांना देताना जिल्हा महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पदाधिकारी.
--
पादचारी पुलाला खाशाबा जाधव यांचे नाव द्या
--
जिल्हा महाराष्ट्र कुस्ती संघटनेतर्फे महापौर परदेशी यांना साकडे
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : शहरातील कमलाबाई शाळेजवळील पादचारी पुलाला ऑलिंपिक पदकविजेते पै. खाशाबा जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी जिल्हा महाराष्ट्र कुस्ती संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष तथा माजी महापौर भगवान करनकाळ यांच्या नेतृत्वाखाली महापौर मायादेवी परदेशी यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
-
१९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवून भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारातील पहिले ऑलिंपिक पदक मिळवून दिले होते. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव म्हणून पादचारी पुलाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जपाव्यात, अशी भूमिका संघटनेने मांडली. अध्यक्ष करनकाळ यांच्यासह गुलाब माळी, शशिकांत सूर्यवंशी, गोरख पाटील, श्याम कानडे, राजू घुगरे, केतन जाधव, अनिल थोरात, विष्णू जावडेकर, गोपाल चौधरी, बंडू पाटील, प्रल्हाद शिंदे, सजन चौधरी, मनोज घोडके, अशोक गवळी, नीलेश महाले, विजय कुलकर्णी व शिवाजी लंगोटे उपस्थित होते.